Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:53 IST2025-11-22T15:52:40+5:302025-11-22T15:53:20+5:30
Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे. भाषिक प्रांतावादाचं विष भाजपा पसरवत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. "रोजच प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातो आहे पण ही नुसती गर्दी नाही तर लढणाऱ्या शिवसैनिकांचे हे सैन्य आहे."
"आपल्यातना जे गेले होते ते परत आले आहेत. हळूहळू सगळ्यांना लक्षात यायला लागलं आहे की, भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत. पण ही लढाई सोपी नाही. जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा. भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाने जसे पक्ष फोडले तसे आता ते घरं देखील फोडायला बघत आहेत. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे."
विभाग क्र. १ मधील शिंदे गटाचे दहिसर विधानसभेतील वॉर्ड क्र. ७ मधील संदिप राऊत व बोरीवली विधानसभेतली वॉर्ड क्र. १८ मधील रुपेश नाईक ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत… pic.twitter.com/MCyeQnS9nl
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 22, 2025
"पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं त्यावेळी ज्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते, त्यांनाच भाजपाने दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश दिला. त्यांना वाटलं की हे पाप लपलं जाईल. पण ते चव्हाट्यावर आल्यावर त्यांनी त्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. आता हे लोकं भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले आहे. भाषेवरून कुणाचे खून करा, मारा अशी आपली भूमिका नाही."
"कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये. हा भाषिक प्रांतवाद पण यांनी सुरू केला. मागाठाणे मधला मराठी माझी आई आहे आणि आई मेली तरी चालेल असं बोलतो त्याचं काय करायचं. घाटकोपरमध्ये संघाचे जोशी बोलतात माझी मातृभाषा गुजराती. हे भाषिक प्रांतावादाचं विष भाजपा पसरवतंय. तोडा, फोडा आणि राज्य करा हे पसरवत आहेत. आपल्याला आपल्या राज्याला, भूमीपुत्रांना सांभाळायचंय आणि तुम्हाला खात्री पटली आहे की हे काम शिवसेनाच करू शकते" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.