Uddhav Thackeray : "जाऊ तिथे खाऊ; शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 02:17 PM2024-02-13T14:17:47+5:302024-02-13T14:27:12+5:30

Uddhav Thackeray Slams BJP : उद्धव ठाकरे य़ांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला आहे. "

Uddhav Thackeray Slams BJP And maharashtra government Over Farmers Protest | Uddhav Thackeray : "जाऊ तिथे खाऊ; शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव"

Uddhav Thackeray : "जाऊ तिथे खाऊ; शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव"

उद्धव ठाकरे य़ांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला आहे. "जाऊ तिथे खाऊ, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव मिळतोय. निवडणुका येतात तेव्हा सबका साथ आणि झाल्या की मित्राचा विकास" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. सोनई, शिर्डी लोकसभा येथील जनसंवाद मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे य़ांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आता राज्यकर्त्यांच्या नालायक कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे. माझी जनता इथले ‘पंच’ आहेत. संकटाच्या छाताडावर चालून जाणारा हीच माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे. शेतकऱ्यांसाठी काम करू म्हणतात, पण दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे होणारे आंदोलन दाखवलं जात नाही. कारण प्रसारमाध्यमांवर सरकारचा दबाव आहे."

"काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, पण गद्दारी करणाऱ्याला खोक्यांचा भाव मिळतोय, अश्रुधूर कशासाठी सोडताय? माझा शेतकरी असाच रडतोय!" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. "भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांबद्दल मला आदर आहे, पण आज त्यांच्या डोक्यावर भ्रष्ट आणि उपरे बसवले जात आहेत."

"तुम्ही म्हणाल ते देशप्रेम-देशसेवा हे आम्ही मानणार नाही. भाजपची पालखी आम्ही वाहणार नाही. निवडणूका येतात तेव्हा 'सबका साथ' आणि निवडणूका  झाल्या की 'मित्राचा विकास’" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच "जाऊ तिथे खाऊ" असा टोला लगावत बोचरी टीका केली आहे. 

Web Title: Uddhav Thackeray Slams BJP And maharashtra government Over Farmers Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.