महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक? मनसेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:12 IST2022-06-27T15:11:21+5:302022-06-27T15:12:08+5:30
महिला पोलिसांशी शिवसैनिकांची झटापट झाल्याची व्हिडीओ केली पोस्ट

महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक? मनसेचा सवाल
Shivsena attacks Police: शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यातील एक गट शिंदे व इतर आमदारांच्या समर्थनार्थ तर दुसरा गट त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरला. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्या विरोधात जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यास प्रत्युत्तर म्हणून 'आम्ही यड्रावकर' म्हणत हजारो समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटले. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, या झटापटीत शिवसैनिक कार्यकर्ते आणि काही महिला पोलीस यांच्यात तणाव निर्माण झाला. यावरून मनसेने शिवसेनेला सवाल केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटात सामील झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यानंतर शनिवारी संतप्त शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांचे फलकावरील फोटो फाडून निषेध केला. यानंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी यड्रावकरांना विरोध करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट केले. "महिला पोलिसांच्या अक्षरशः अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक? पोलिसांना मारहाण करणारे,हे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकतात का? संदीप देशपांडे यांचा स्पर्श देखील झाला नव्हता आणि महिला पोलीस कर्मचारी पडली तेव्हा केलेलं नीच राजकारण आठवतंय का? आता काय कारवाई करणार?", असा सवाल त्यांनी व्हिडीओ ट्वीट करून विचारला.
महिला पोलिसांच्या अक्षरशः अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक ?
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 27, 2022
पोलिसांना मारहाण करणारे,हे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकतात का ?
संदीप देशपांडे यांचा स्पर्श देखील झाला नव्हता आणि महिला पोलीस कर्मचारी पडली तेव्हा केलेलं नीच राजकारण आठवतंय का ?
आता काय कारवाई करणार ? pic.twitter.com/BGjAaOZzkP
दरम्यान सोमवारी शिवसैनिक यड्रावकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांनी खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसैनिकांना यड्रावकरांच्या कार्यालयापर्यंत जावू न दिल्याने शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयावर आगेकूच केली.