शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

धर्मवीर २, हिंदुत्व अन् राजकारण...; संजय राऊतांनी CM एकनाथ शिंदेंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 11:44 IST

गुरुपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते जितेंद्र, सलमान खान यांच्या उपस्थितीत धर्मवीर २ सिनेमा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सिनेमावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

मुंबई - आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखतो. आज आनंद दिघेंवर काहीजण स्वत:ची मालकी दाखवतायेत, सिनेमा-नाटकं काढतायेत. पण आनंद दिघेंच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आणि मते होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही जर त्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावं लागेल. आज गुरुपोर्णिमा आहे त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलंय, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघेंना गुरू मानून त्यांचे खोटे चित्र समोर आणत असतील तर तो आनंद दिघेंचा अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्य घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल पण भविष्यात तुम्हीसुद्धा या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. दिघेंच्या नावाखाली खोट्या गोष्टी पसरवणं. आनंद दिघे यांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं ते वेगळं नव्हते. बाळासाहेबांचे हिंदुत्वच आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं, ते वेगळं नव्हते. ठाण्यात हिंदुत्व वेगळं नव्हते. असा काही झालं नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत हिंदुत्वाच्या ज्या काही वेगळ्या चुली मांडल्यात त्या आनंद दिघेंनीही कधी मान्य केल्या नसत्या. हे चित्रपट बोगस आणि भंपक आहे. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट याआधी आले आहेत. काश्मीर फाईल्स भाजपाच्या लोकांनी निर्माण केलेत. आपल्या खोट्या भूमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला ते सर्व चुकीचे आहे अशी टीकाही संजय राऊतांनी धर्मवीर २ या सिनेमावर केली आहे.

दरम्यान, जे खोटे आहे त्याची चिंता आपण का करायची? पहिल्या चित्रपटात आनंद दिघेंचा महानिर्वाण दाखवला आहे मग त्यानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो. पण विधानसभा निवडणुका आहेत. खोट्याला उजाळा द्यायचा आहे. आपल्या बेईमानीवर तारे चमकवायचे आहे. त्यामुळे आनंद दिघेंसारखे महान निष्ठावान शिवसैनिकाचा, शिवसेना नेत्याचा वापर करायचा हे काम त्यांचे आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

धर्मवीर २ डबल यशस्वी होईल, मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांवर चालण्याची दिशा देऊन जातो. बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या पाऊलावर पाऊल नव्हे तर जीव टाकून आम्ही काम करतोय. सिनेमाच्या माध्यमातून धगधगता भूतकाळ समोर आणलाय. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा सिनेमा डबल यशस्वी होईल असं सांगत धर्मवीर २ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्या.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेHindutvaहिंदुत्व