शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 8:57 PM

पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

परभणी - पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच आडीमध्ये 56 पक्ष एकत्र आले आहे. मात्र 56 पक्षच काय 56 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी परभणीवरील भगवा खाली उतरणार नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा आज परभणी येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या शरद पवार यांच्या विधानांचा जोरदार समाचार घेतला. ''आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीने शेण घोटाळा केला होता. पाच वर्षांपूर्वी यांनी केलेल्या घोटाळ्यांवर मी एक पुस्तकच प्रकाशित केले होते. लोकं विसरली असतील. पण या आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे वर्णन करायला. बाराखडीही कमी पडेल,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवार बोलतात की उद्धव ठाकरे वारा येईल तशी दिशा बदलतात. याच वाऱ्यामुळे माझा भगवा ध्वज डौलाने फडकत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही उद्धव ठाकरे बरसले. ''राहुल गांधी सावरकरांना डरपोक बोलतात. म्हणून राहुल गांधींना सांगतोय की हा हिंदुस्तान आहे हा इटली नाही आहे.  राहुल गांधी आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही. काँग्रेस जर क्रांतिकारकांना देशद्रोही बोलतोय. अशा कपाळकरंटकाना हा देश देऊ नका, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. ''शेतकऱ्यांसाठीच्या जाचक अटी याचा पाठपुरावा करून त्या शिवसेनेने काढून टाकल्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.  गेली पाच वर्षे माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांना मदत करतोय आणि तेव्हा राष्ट्रवादीवाले घराच्या आत दरवाजा लावून  बसले होते., असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेparbhani-pcपरभणीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक