शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार ठाकरेंसह दोन पोलिस कर्मचारी निलंबित

By admin | Updated: July 4, 2014 00:42 IST

पोलिस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीमध्ये तिघेही दोषी आढळल्याने त्यांना सोमवारी निलंबित केले.

अकोला: न्यायालयाने एका डॉक्टरविरुद्ध बजावलेल्या अटक वॉरंटची तामील न करण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी करणे रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासह पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना चांगलेच अंगलट आले. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीमध्ये तिघेही दोषी आढळल्याने त्यांना सोमवारी निलंबित केले. ठाणेदार व पोलिस कर्मचार्‍यांच्या या कारनाम्याचे सर्वप्रथम वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. शहरातील समीरसिंह ठाकूर यांच्याविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या एका गुन्हय़ात न्यायालयाने बिगर जमानती वॉरंट काढला. अंमलबजावणीसाठी हा वॉरंट रामदासपेठ पोलिस ठाण्यात पाठविला. रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांनी हा बिगर जमानती वॉरंट एका कर्मचार्‍याकडे अंमलबजावणीसाठी दिला; परंतु या कर्मचार्‍याने हा वॉरंट अंमलबजावणीसाठी घेतला नाही. त्याच्याऐवजी जमादार जावेद खान कदीर खान, अश्‍विन सिरसाट यांनी हा वॉरंट घेतला. या दोघा पोलिस कर्मचार्‍यांनी यासंदर्भात ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचारी समीरसिंह ठाकूर यांच्याकडे गेले. त्याला तुमच्याविरुद्ध पकड वॉरंट असल्याचे सांगितले आणि हा पकड वॉरंट तामील न करण्यासाठी दोघांनी ५0 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित डॉक्टरने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना फोनवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तक्रारीची तातडीने दखल घेत, त्या दोन पोलिस कर्मचार्‍यांची तडकाफडकी रामदासपेठ पोलिस ठाण्यातून मुख्यालयात बदली केली. यासंबंधी लोकमतने कर्मचार्‍यांवर कारवाई, ठाणेदाराचे काय? असे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची उशिरा का होईना पोलिस अधीक्षकांनी दखल घेत, ठाणेदार विनोद ठाकरे व कर्मचारी जावेद खान, अश्‍विन सिरसाट यांना निलंबित केले.