samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 07:38 IST2025-06-20T07:37:55+5:302025-06-20T07:38:53+5:30

samruddhi mahamarg Accident News: शहापूर तालुक्यातील वासिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

Two people died in horrific accident jeep and container on samruddhi mahamarg | samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!

samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!

लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : शहापूर तालुक्यातील वासिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सातजण जखमी झाले. ही दुर्घटना वासिंद आणि आमणे दरम्यान गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. अब्दुल पाशा शेख (वय ६५) आणि जाहीद सिद्दिकी (४०) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यामधील दोन ते तीनजणांना जास्त मार लागल्याचे भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयातून सांगण्यात आले. 

समृद्धी महामार्गावरून एक कंटेनर मुंबईकडे जात होता. यादरम्यान नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून भिवंडीकडे भरधाव वेगात निघालेल्या जीपचालक मारुती गुंजाळ याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व जीप पुढे चाललेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह सहा जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गवरील रुग्णवाहिका, महामार्ग पोलिस शहापूरच्या प्रभारी अधिकारी छाया कांबळे यांनी कर्मचारी पाठवून अपघातग्रस्त  जखमींना भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींना अधिक उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात हलविले आहे. 

डुलकी लागल्याने अपघात 
पहाटेच्या सुमारास पाऊस कोसळत होता. अतिवेगात असलेल्या जीपचालक मारुती गुंजाळ याला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.  
 

Web Title: Two people died in horrific accident jeep and container on samruddhi mahamarg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.