शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन नक्षल कमांडरला अटक

By admin | Updated: September 28, 2014 01:00 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर विशेष अभियान राबवून गडचिरोली पोलिसांनी दोन मोठ्या नक्षलवाद्यांना शनिवारी अटक केली. उल्लेखनीय म्हणजे अटक झालेले शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे याच्यावर

गडचिरोली पोलिसांची कामगिरी : नक्षलवाद्यांना हादरागडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर विशेष अभियान राबवून गडचिरोली पोलिसांनी दोन मोठ्या नक्षलवाद्यांना शनिवारी अटक केली. उल्लेखनीय म्हणजे अटक झालेले शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे याच्यावर १२ लाखांचे तर जितेश्वरी ऊर्फ माहेश्वरी इंद्रजी मडावी हिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धानोरा उपविभागात गडचिरोली जिल्हा पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. या अभियानादरम्यान तुकूम-मर्केगाव जंगल परिसरात जहाल नक्षलवादी शामलाल ऊर्फ कमलेश रूपसिंग गावडे (२७) रा. मुंजल ता. मानपूर जि. राजनांदगाव (छत्तीसगड) याला अटक करण्यात आली. शामलाल हा जहाल नक्षलवादी असून तो मदनवाडा दलम कमांडर आहे व जितेश्वरी ऊर्फ माहेश्वरी इंद्रजी मडावी (२०) रा. अंबाटोला ता. मानपूर जि. राजनांदगाव (छत्तीसगड) हिलाही अटक करण्यात आली आहे. ती औंधी दलम सदस्य आहे. शामलाल व जितेश्वरी या दोन नक्षलवाद्यांच्या विरोधात धानोरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३५३, १४७, १४३, १४८, १४९, १२०, भारतीय हत्यार कायदा ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. धानोरा न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात हे दोघेही कार्यरत होते. त्यांच्यावर दोन्ही राज्यात १० ते १२ गंभीर नक्षली गुन्हे आहेत. यापूर्वीही पोलिसांनी औंधी दलमच्या नक्षल कमांडरला अटक केली आहे. वर्षभरात एकूण १७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)