शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे योजना होणार बंद!

By admin | Updated: February 22, 2015 01:32 IST

वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कालबाह्ण तसेच पुनरावृत्ती होत असलेल्या योजना बंद करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. किमान २०० योजना बंद केल्या जावू शकतात.

पुनरावृत्ती टाळणार : वैयक्तिक लाभार्थ्यांना वस्तू वाटप बंदयदु जोशी - मुंबईवर्षानुवर्षे सुरू असलेल्या कालबाह्ण तसेच पुनरावृत्ती होत असलेल्या योजना बंद करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. किमान २०० योजना बंद केल्या जावू शकतात. शिवाय, वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये वस्तू वाटपाऐवजी अनुदान देण्यावर भर देऊन कोट्यवधी रुपये वाचविण्याचा विचार प्राधान्याने सुरू झाला आहे. कोणत्याही लाभार्थीवर गदा न आणता शासकीय योजनांचे सुलभीकरण करण्यावर तसेच विविध योजना एकाच छताखाली आणण्याची भूमिका वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून त्यातून शासकीय योजनांची परिणामकारक आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नुसता लोकानुनय करण्याच्या नादात कंत्राटदारधार्जिण्या योजना राबवायच्या नाहीत, सरकारचे धोरण आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध विभाग आणि महामंडळांमार्फत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यात लाभार्थींपेक्षा कंत्राटदारांचेच भले अधिक होते. त्यापेक्षा लाभार्र्थींना थेट रोख अनुदान दिले तर संबंधित बाबीच्या खरेदीची मूभा त्याला मिळेल. कंत्राटदार, पुरवठादार यांच्याशी नोकरशाहीचे असलेले संगनमतही मोडित काढता येणार आहे. नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांच्या योजनांच्या आढाव्यासाठी बैठकी घेत आहेत. कोणत्या योजना एकत्रित करता येतील, पुनरावृत्ती कशी टाळता येईल यासंबंधी सूचना मागविल्या जात आहेत. एकच योजना ग्रामविकास विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या अशा अनेक योजना आहेत की ज्यांची पुनरावृत्ती होते. दुसरे उदाहरण घरांच्या योजनांचे. रमाई आवास योजना, राजीव आवास योजना, बीएसयुपी, म्हाडा, सिडकोच्या योजना एकाचवेळी असल्याने लाभार्थी गोंधळतात. च्अनेक योजना कालबाह्ण झाल्या आहेत. आदिवासींना ताडपत्री वाटप, शेतकऱ्यांना ५० वर्षांपूर्वी वापरात असलेल्या कृषी अवजारांचे वाटप ही त्याची काही उदाहरणे. च्अनेक शीर्ष (हेड) असे आहेत की ते हास्यास्पद आहेत. सरकारी दवाखान्यातील एमबीबीएस डॉक्टरच्या पगाराचा हेड वेगळा, बीएएमएस डॉक्टरचा हेड वेगळा तर नर्सच्या पगाराचा हेड वेगळा. या पद्धतीत प्रशासकीय काम वाढते, कोषागारावरील कामाचा बोजा वाढतो. आता हे हेड एकत्र करण्याचा (क्लब) विचार केला जात आहे.