शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

'त्या’ चिमुकलीवर दोन वेळा अत्याचार

By admin | Updated: August 23, 2016 22:13 IST

शाळेतील आठवर्षीय चिमुकलीशी अहेमद खान अमीन खान या नराधम शिक्षकाने अश्लील चाळेच नव्हे, तर दोन वेळा अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 -   शाळेतील आठवर्षीय चिमुकलीशी अहेमद खान अमीन खान या नराधम शिक्षकाने अश्लील चाळेच नव्हे, तर दोन वेळा अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. जिन्सी पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष न्यायाधीश एस.एस. नायर यांनी या शिक्षकास २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आझाद चौकात राहणारी आठवर्षीय मुलगी नागसेन कॉलनीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिकते. शाळेतील शिक्षक अहेमद खान (३७, रा. हर्षनगर, मंजूरपुरा) याने चिमुकलीवर दोन वेळा अत्याचार केला होता. ‘अत्याचाराची
वाच्यता केल्यास आई- वडिलांना ठार मारीन,’अशी धमकी त्याने मुलीस दिली होती. या घटनेमुळे भेदरलेली मुलगी आजारी पडली होती. आजी व आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, शाळेत छळ होत असल्याचे सांगितले. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सोमवारी दुपारी मुलीला घेऊन शाळा गाठली. अहेमद खान याच्याकडे बोट दाखवून त्यानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी अहेमद खान यास
बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने जिन्सी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. सोमवारी रात्री उशिरा मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर दोन वेळा जबरी अत्याचार केल्याचे समोर आले. महिला पोलीस अधिकाºयांनी मुलीचा जबाब नोंदवला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात बदल करून बलात्कार केल्याचे कलम लावले.
अहेमद खान यास विशेष न्यायाधीश नायर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 
नातेवाईक आयुक्तांना भेटले... 
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली.  शिक्षक अहेमद खान याला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.