शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

शुल्क घेऊनही तुंगारेश्वरला सुरक्षेची वानवा

By admin | Updated: July 19, 2016 03:26 IST

वसई पूर्वेकडील डोंगराच्या दाट अभयारण्यात असलेल्या तुंगारेश्वर आणि चिंंचोटी येथील धबधबे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

शशी करपे,

वसई- वसई पूर्वेकडील डोंगराच्या दाट अभयारण्यात असलेल्या तुंगारेश्वर आणि चिंंचोटी येथील धबधबे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत. शनिवार आणि रविवारी याठिकाणी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, अतीउत्साही पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिशय धोकादाक असलेल्या या धबधब्यांमध्ये बुडून गेल्या तीन वर्षांत दहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटताना स्वत:च्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी तर सकाळपासूनच गर्दी ओसंडून वाहत असते. फेसाळणारे पाणी आणि चोहोबाजूंनी दाट वनराई यामुळे इथला निसर्ग मनमोहून टाकणारा असतो. धबधब्याची मजा लुटून दाट वनराईत फेरफटका मारण्याचा आनंद काही औरच असतो. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यानंतर संध्याकाळ कधी होते याचे भान रहात नाही. धबधब्यात डुंबण्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना पोलीस आणि वनखात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. धबधबे सुंदर आणि मनमोहक असले तरी धबधब्याच्या खोलीचा व त्यात असलेल्या कपारींचा अंदाज येत नाही. त्यामुळे अती उत्साहात पाण्यात उड्या मारल्यास जीव गमावण्याचा धोका असतो. येथे येणाऱ्या पर्यटकांकडून वनखाते प्रवेश फी आकारते. मात्र, पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. याठिकाणी सुरक्षिततेसाठी पोलीस अथवा वनखात्याचे रखवालदार नसतात.>सुरक्षेच्या अभावी २०१३ ते २०१५ या कालावधीत तुंगारेश्वर धबधब्यात ३ तर चिंचोटी धबधब्यात बुडून ७ पर्यटकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे हे दोन्ही धबधबे पिकनिक स्पॉट बनण्याऐवजी डेथ स्पॉट बनत आहेत.