शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात खरी सत्ता ‘बारामती’चीच!

By admin | Updated: September 30, 2015 00:50 IST

अकोला येथील पत्रकार परिषदेत वामनराव चटप यांचा सत्तारूढ भाजप-सेनायुतीला उपरोधिक टोला.

अकोला: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली तरी खरे सत्ताधारी ह्यबारामतीह्णकरच असल्याचा उपरोधिक टोला शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी अकोला येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. 'विदर्भ मिळवू औंदा' अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. त्यानिमित्ताने विदर्भात करण्यात येणार्‍या आंदोलनाची माहिती देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी आमदार चटप यांनी राज्य शासनाच्या कामावर ताशेरे ओढतानाच विदर्भातील पुत्र राज्यातील सत्ताधारी असताना विदर्भावर सर्वच क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वीजमंत्री, आदिवासी उपाययोजना विभागाचे मंत्री विदर्भातील असताना पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन आदिवासीबहुल जिल्हय़ांचा उल्लेखही नाही. विदर्भात ५५00 हजार मेगावॉट वीज निर्मिती होत असताना येथील शेतकरी वीज जोडणीसाठी आत्महत्या करतो आहे. दुसरीकडे मेट्रो सिटीच्या नावाखाली मुंबई-पुण्यात झीरो लोडशेडिंग होते. ग्रामीण भागासाठी वीज उपकेंद्र मंजूर करताना बारामतीसारख्या तालुक्यासाठी १00 उपकेंद्रांना मंजुरी मिळते तर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिलतील तालुक्यांना सरासरी ५ उपकेंद्रही मिळत नाही. कोळसा खाणींचे वाटप होताना विदर्भातून राज्यसभेवर निवडून आलेला आणि मंत्री झालेला खासदार धोरणात बदल झाल्याचे सांगतो, तेव्हा विदर्भातील दोन वजनदार म्हणवून घेणारे केंद्रातील मंत्री आणि भाजप-शिवसेनेचे ८ खासदार काहीही बोलत नाही. राज्यातही हीच परिस्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले अर्धेअधिक आमदाराच भाजप-शिवसेनेच्या तिकिटांवर निवडून आले आहे. धोरणात बदल केल्यानंतर त्यांचा विरोध होणार आहे. याचाच अर्थ राज्यात सत्ता युतीची असली तरी खरे राज्यकर्ते बारामतीकरच आहेत. या पत्रकार परिषदेला अरुण केदार, अँड. नंदाताई पराते आदींची उपस्थिती होती.