सोलापूरमध्ये विनाचालक ट्रक गर्दीत घुसला; अनेक दुचाकींचे नुकसान...पाहा थरार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 22:58 IST2018-09-27T22:58:04+5:302018-09-27T22:58:27+5:30

सोलापूरमध्ये विनाचालक ट्रक गर्दीत घुसला; अनेक दुचाकींचे नुकसान...पाहा थरार...
सोलापूर: विजापूरहून सोलापूरकडे येणारा मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत विजापूर नाका येथील 19 गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे. हा थरार गुरुवारी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घडला. घटनेनंतर चालक पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
विजापूर नाक्यावर ऐन गर्दीमध्ये ट्रकचे नियंत्रण सुटल्याने पार्किंग केलेल्या दुचाकींवर घुसला. हे पाहून सचिन काशीद या युवकाने धाडस करत चालत्या ट्रकमध्ये चढून थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. तरीही एकजण जखमी झाला आहे.
या ट्रकमध्ये चालक नव्हता. यामुळे ट्रक आपोआप गिअरमध्ये जाऊन गर्दीत घुसला असण्याची शक्यता आहे.