शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

प्रत्येक जिल्ह्यांत तिप्पट ऑक्सिजनचा साठा, राजेश क्षीरसागर यांची बैठकीत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:12 IST

प्रारंभी कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव आणि आता पुढची तयारीविषयी सांगितले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला.

ठाणे : जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण कामांमध्ये लोकोपयोगी कामांची बहुतांशी जिल्ह्यांत कमी दिसून येत असून ग्रामीण तरुणांच्या स्वयंरोजगारांविषयी नावीन्यपूर्ण कामांची कमतरता असल्याची खंत आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तिप्पट साठा तयार ठेवण्याचे सूतोवाच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी ठाण्यात केले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्मृती स्मारक उद्यान उभारणी व शाहू महाराज कार्याची ओळख करून देणारे उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोकण विभागीय जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील नियोजन भवनमध्ये मंगळवारी पार पडली. कोकण विभागीय आयुक्त नसल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांचे स्वागत केले. दहा वर्षांपूर्वी रत्नाकर महाजन यांच्यानंतर प्रथमच ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या कार्याची आठवण झाल्याचे सांगितले.कोल्हापूरनंतर आता कोकणातील जिल्ह्याचा आढावा घेत असून या पद्धतीने राज्यातील सर्वच सहा विभागांमध्ये जिल्हा नियेाजन समितीच्या नावीन्यपूर्ण कामांसह कोरोनाकाळातील उपाययोजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या बैठकीला ठाणेसह मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा आढावा यावेळी दिला. समाधानकारक काम असल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी शासनाच्या धोरणानुसार नावीन्यपूर्ण कामांमधील काही कमतरता असल्याची खंत बोलून दाखवली.प्रारंभी कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव आणि आता पुढची तयारीविषयी सांगितले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. 

आगीच्या घटनांमधून सरकारची होते बदनामी- कोरोनाच्या दोन लाटांमध्ये ऑक्सिजन जास्त लागला. त्यास अनुसरून तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला साठा तिप्पट तयार ठेवण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. - या कोरोनाच्या कालावधीत हॉस्पिटलला आग लागल्याच्या घटनांमध्येही लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सरकारची फार मोठ्याप्रमाणात बदनामी होते. यामुळे ऑक्सिजन साठा कमी पडू नये यासाठी नियोजनाच्या सूचना दिल्या. 

 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस