शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांना धोबीपछाड देण्यासाठी सेनेची चाल

By admin | Updated: August 2, 2014 03:03 IST

मुस्लिमांच्या विरोधात नेहमीच आग ओकणाऱ्या शिवसेनेने इत्तेहाद-ए-मजलीस मुस्लीम या पक्षाचे नेते अकबरउद्दीन ओवेसी यांनी मुंब्य्रात इफ्तारसाठी हजेरी लावली असता त्याविरोधात ‘ब्र’ही काढला नाही.

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून ठाणे शहरात शिवसेनेने एकीकडे काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे समर्थक नगरसेवक रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचले असताना दुसरीकडे मुंब्य्रातून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना धोबीपछाड देण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या मदतीने बुरख्याआडून ‘डाव’ खरे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़याचाच भाग म्हणून मुस्लिमांच्या विरोधात नेहमीच आग ओकणाऱ्या शिवसेनेने इत्तेहाद-ए-मजलीस मुस्लीम या पक्षाचे नेते अकबरउद्दीन ओवेसी यांनी मुंब्य्रात इफ्तारसाठी हजेरी लावली असता त्याविरोधात ‘ब्र’ही काढला नाही. तिकडे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम बांधवाचा रोजा तोडणारे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा देशभरातून धिक्कार होत असताना मुंब्य्रातील ओवेसी समर्थकांनी व अन्य मुस्लिमांनी त्यांचा निषेध न करता मौन पाळणे पसंत केले आहे़ या दोन्ही घटना ठाण्यासह कळवा-मुंब्रा मतदारसंघांत आगामी राजकीय वातावरण कसे राहील, याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत़एरव्ही, ऊठसूट या ना त्या थातूरमातूर कारणावरून निषेधासाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना अन् धार्मिक भावना दुखावल्यानंतर नको तेवढा कांगावा करणाऱ्या मुस्लीम बांधवांनी ठाण्यातील स्वत:ला मीच खरा राष्ट्रवादी नेता व मुस्लिमांचा तारणहार, असा डांगोरा पिटणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांचे ‘डाव’ खरे करण्यासाठी घेतलेल्या या संयमी भूमिकेकडे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षक बुरख्याआडचे राजकारण असे वर्णन करीत आहेत. राष्ट्रवादीमुक्त ठाणे करण्यासाठी शिवसेनेने त्या पक्षाचे शहरातील एकमेव आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना धोबीपछाड देण्यासाठी हे राजकारण खेळल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)