Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:28 IST2025-09-01T12:27:34+5:302025-09-01T12:28:37+5:30

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घरी गेलेल्या रागातून रोहा तालुक्यातल्या आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण करण्यात आली.

Tribal family beaten up, accused of going to Ganpati darshan with daughter; 9 people arrested | Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक

Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक

आगरदांडा: गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी घरी गेलेल्या रागातून रोहा तालुक्यातल्या आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीत राहणारा सुमीत मंगेश वाघमारे हा मिठागर येथील मुलीसोबत तिच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला असता. त्याचा राग धरुन मिठागर येथील नऊ जणांनी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ च्या दरम्यान जमाव जमवून भालगाव येथील आदिवासी वाडी येथील रस्तावर येऊन मंगेश महादेव वाघमारे यांना हाताबुक्याने आणि लाथेने मारहाण केली. त्यांची पत्नी संगिता, मुलगा साहिल आणि काका चंदर श्रावण वाघमारे यांच्या डाव्या मारहाण केली. हातावर
चुलत भाऊ राम चंदर वाघमारे यांच्या डोक्यावर तसेच त्यांचा मुलगा सागर वाघमारे यांच्या उजव्या पायाचे पोटरीवर चाकुने वार करुन गंभीर दुखापत केली. याची माहिती मिळताच मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रथम मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेले.

दरम्सान, मारहाणीची माहिती मिळताच अलिबाग रायगड उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सर्तक झाल्या आहेत.

फिर्यादी मंगेश महादेव वाघमारे (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिपेश कृष्णा ठाकूर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकूर, विराज विजय ठाकूर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापुरकर, दिपेश दत्ताराम माळी, विनिते विजय ठाकूर, सागर पांडुरंग ठाकूर (सर्व रा. मिठागर पो. सावली ता.मुरुड) यांच्याविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आला आहे. मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे तपास करीत आहेत.

Web Title: Tribal family beaten up, accused of going to Ganpati darshan with daughter; 9 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.