आयपीएससह दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:55 IST2019-01-02T20:55:14+5:302019-01-02T20:55:45+5:30
एका अधिकाऱ्याने नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होता परस्पर नवीन ठिकाणी बदली करुन घेतली आहे.

आयपीएससह दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बदल्या करण्याची पद्धत सुरुच असून एका परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यासह सहाय्यक आयुक्तांच्या बदलीचे आदेश नुकतेच गृह विभागाकडून काढण्यात आले.
परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक मुम्माका सुदर्शन नाशिक ग्रामीण येथून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर जालना येथील पोलीस मुख्यालयात बदली झालेल्या सचिन बारी यांची पुणे जिल्ह्यात दौंडच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बारी हे जालना येथे बदलीच्या ठिकाणी हजर न होता परस्पर नवीन ठिकाणी बदली करुन घेतली आहे.