शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

मुंबई - पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ११ ऑगस्टपर्यंत राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 4:51 PM

मुसळधार पावसामुळे रात्री मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे...

ठळक मुद्देमंकी हिलजवळील कोसळलेली दरड काढण्यास ३-४ दिवसांची कालावधी 

पुणे : घाट क्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणकी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानचीरेल्वे वाहतुक रविवार (दि. ११) पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापुरला जाणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेससह लांबपल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. ३) रात्री मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे. तेव्हापासून पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दोन्ही शहरांदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या धावलेल्या नाहीत. तसेच प्रगती व डेक्कन एक्सप्रेस या गाड्या यापुर्वीच रद्द करण्यात आल्या होत्या. या मार्गावर एकही रेल्वेगाडी न धावल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच आता रेल्वेकडून रविवारपर्यंत या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबईला ये-जा करण्यासाठी एसटी बस तसेच खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. इंटरसिटी गाड्यांप्रमाणे लांबपल्याच्या अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्याचा आणि काही गाड्या अंशत: रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.रद्द न केलेल्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत. तर काही गाड्यांना दौंड ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आले आहे. या गाड्या पुणे किंवा दौंड स्थानकातून नियमित वेळेनुसार सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.-----------रविवारपर्यंत रद्द गाड्या- डेक्कन क्वीन- इंद्रायणी एक्सप्रेस- सिंहगड एक्सप्रेस- इंटरसिटी एक्सप्रेस- पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर- सोलापुर-मुंबई-सोलापुर सिध्देश्वर एक्सप्रेस- मुंबई-पंढरपुर-मुंबई पॅसेंजर- मुंबई-कोल्हापुर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस- कोल्हापुर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस- हुबळी-मुंबई एक्सप्रेस - हैद्राबाद-मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस (दि. १२ पर्यंत)- मुंबई-चेन्नई-मुंबई एक्सप्रेस (दि. १० पर्यंत)----------------इतर दिवशी रद्द गाड्या दि. ९ : पुणे-निझामुद्दीन एक्सप्रेस, विजापुर-मुंबई पॅसेंजर, लातुर-मुंबई एक्सप्रेस, निझामुद्दीन-पुणे एक्सप्रेस, इंदौर-पुणे-इंदौर एक्सप्रेस, दि. १० : ग्वाल्हेर-पुणे एक्सप्रेस, बिदर-मुंबई एक्सप्रेस, पुणे-इंदौर एक्सप्रेस, जयपुर-पुणे एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई एक्सप्रेसदि. ११ : पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, लातुर-मुंबई-लातुर एक्सप्रेस, पुणे-निझामुद्दीन एक्सप्रेस, पुणे-जयपुर एक्सप्रेस-----------------

 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईrailwayरेल्वेpassengerप्रवासी