Mumbai Pune Expressway Traffic Update: रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला काल संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्त टँकरमधून ज्वालाग्राही वायूची गळती होत असल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, सुरक्षिततेसाठी मुंबईकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत.
मंगळवारी संध्याकाळी खंडाळा घाटामधील आडोशी बोगद्याजवळ रयासन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. तेव्हापासून मुंबई-पुणे महामार्गावर ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याबात अधिक माहिती देताना महामार्ग सुरक्षा पथकाने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खंडाळा घाटामध्ये मुंबई कॉरिडॉर ( मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ) आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर पलटी झाला आहे. त्यामधून ज्वालाग्रही गॅस लिकेज होत असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत. वाहनांच्या सुरक्षिततेकरिता मुंबईकडील मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई व पुणे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून आज, एक्सप्रेस वे चा प्रवास शक्यतो टाळावा, असं आवाहनही महामार्ग सुरक्षा पथकाने केलं आहे.
या अपघाताला आता १६ तास उलटून गेले तरी वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्हावरील एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेत रस्त्या मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाइट चुकली आहे. काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, “टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो?” असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
Web Summary : A tanker accident on the Mumbai-Pune Expressway has caused a massive traffic jam. A flammable gas leak forced the closure of the Mumbai-bound lane. Thousands are stranded, facing shortages of water, food, and sanitation. Passengers question the prolonged closure despite toll collection, demanding immediate action.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर टैंकर पलटने से भारी जाम लग गया है। ज्वलनशील गैस के रिसाव के कारण मुंबई जाने वाली लेन बंद कर दी गई है। हजारों लोग फंसे हुए हैं, पानी, भोजन और स्वच्छता की कमी का सामना कर रहे हैं। यात्रियों ने टोल संग्रह के बावजूद लंबे समय तक बंद रहने पर सवाल उठाए, तत्काल कार्रवाई की मांग की।