शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले', काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:53 IST

Harshwardhan Sapkal Criticize Central Government: शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

हिंगोली -  अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागासवर्गीय समाजाचा आक्रोश पोहचवण्यासाठी शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आल्याचे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली कमळनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. सकाळी माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वर्धा ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा कोणाच्याही फायद्यासाठी नसून गडचिरोलीतील खनिज विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाहतूक सुलभ करता यावी यासाठी हा महामार्ग केला जात आहे. हा महामार्ग पुंजीपतींसाठी टाकलेले रेड कार्पेट आहे. या महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही व सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. कंत्राटदारांची बिले थकली आहेत, पगार करायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासही सरकारकडे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत सरकारच्या लाडक्या पुंजीपतीसाठी ८८ हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग बनवला जात आहे, हे दिवाळखोरीचे लक्षण आहे. राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आखाती युद्धामुळे एलपीजी गॅस महाग झाल्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल वा गॅसच्या किमती कमी झाल्या तर त्य़ाचा फायदा सरकार ग्राहकांना देत नाही मात्र तुटवडा निर्माण झाला की कांगावा करत पूंजीपतीसाठी भाव वाढ करते, त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होतो. युद्धामुळे निर्माण झालेल्या  आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडे काही नियोजन नाही, आंतरराष्ट्रीय निती, धोरण नाही. केंद्र सरकारने डोळे उघडून बघावे, संसदेत चर्चा करावी, विरोधी पक्षांशी बोलावे. अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नये, ताठ मानेने इभे रहावे, सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहिल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.. कळमनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रेचा समारोप जाहीर सभेने झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : US Trade Deal Collapsed Farm Prices, Congress Alleges Modi Sold Country

Web Summary : Congress alleges US trade deals caused farm price drops, harming farmers. Modi's government is blamed, accused of prioritizing corporations over farmers, leading to protests and a march led by Harshvardhan Sapkal. The government is also criticized for prioritizing infrastructure projects benefiting corporations while neglecting farmers' needs.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा