दारूबंदीसाठी पोलीस चौकीसमोर विष प्राशन

By Admin | Updated: September 4, 2015 00:26 IST2015-09-04T00:26:48+5:302015-09-04T00:26:48+5:30

लोणार तालुक्यातील घटना ; ऐनवेळी ही मोहीम पुढे ढकलल्याने संतापलेल्या महिलेने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Toxic poison in police chowki | दारूबंदीसाठी पोलीस चौकीसमोर विष प्राशन

दारूबंदीसाठी पोलीस चौकीसमोर विष प्राशन

बुलडाणा : अवैध दारू विक्रीची दुकाने बंद करण्यासाठी लोणार तालुक्यातील बिबी येथील महिलांनी केलेल्या विविध आंदोलनांची दखल घेत, प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी दारूबंदीकरीता स्वाक्षरी मोहीम आयोजित केली होती. मात्र ऐनवेळी ही मोहीम पुढे ढकलल्याने संतापलेल्या एका महिलेने येथील पोलीस चौकीसमोर विष प्राशन केल्याची घटना गुरुवारी घडली. पोलीस, महसूल व उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदीसाठी स्वाक्षरी अभियान घेण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी ३ सप्टेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार सर्व महिला गुरुवारी सकाळपासून संतोषी माता मंदिरात स्वाक्षरी अभियानासाठी सज्ज झाल्या होत्या. मात्र महसूल विभागाने ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे कारण दाखवून अभियान पुढे ढकलले. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या सुनिता श्रीकिसन भांड यांनी पोलीस चौकीसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.

Web Title: Toxic poison in police chowki