शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: July 10, 2017 03:10 IST

वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल ३५३० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिल्याची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी पांडवकडा धबधबा बंद केला आहे. खारघरच्या टेकड्यांवर जाण्यासही परवानगी दिली जात नाही. देहरंग धरणासह इतर ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाण्यासही मनाई केली जात आहे. वर्षासहलीसाठी असलेल्या बहुतांश ठिकाणी प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने पर्यटकांकडून कर्नाळा अभयारण्य परिसराला भेट देण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. या परिसरामध्ये छोटे धबधबे, विविध प्रकारचे पक्षी, कर्नाळा किल्ला पाहण्यास मिळत असल्याने शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. २ जुलैला रविवारी १७८२ पर्यटकांनी या परिसराला भेट दिली होती. ८ जुलैला शनिवारी १२५० व रविवारी सायंकाळपर्यंत २२८० पर्यटकांनी भेट दिली होती. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे वाहनतळाची जागा कमी झाली असून पर्यटकांना रोडवर वाहने लावावी लागली होती. पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, उत्साहामध्ये तलावामध्ये उतरू नये, यासाठी वनविभाग व्यवस्थापनाने विशेष उपाययोजना केल्या होत्या; परंतु यानंतरही सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक जण तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पर्यटकांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे; परंतु पर्यटकांनीही सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.>अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटकांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य सहकार्य करावे व सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा. - अन्वर शेख, वन परिमंडळ अधिकारी>रविवारी तब्बल २२८० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ही विक्रमी संख्या आहे. वनविभागाचे कर्मचारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. - पी. पी. चव्हाण, परिक्षेत्र वन अधिकारी