Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:06 IST2019-01-04T18:04:07+5:302019-01-04T18:06:19+5:30
संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 जानेवारी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
2050पर्यंत देशाला एक नव्हे तर जास्त मराठी पंतप्रधान मिळतील, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
VIDEO: राज ठाकरेंवर टीका करणाऱ्याला काढायला लावल्या उठाबशा
राज ठाकरे 'बोलघेवडा पोपट'; 'त्या' व्यंगचित्राला भाजपाचं व्यंगचित्रानेच प्रत्युत्तर
आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्यानं सरकारचा कोतेपणा उघड- उद्धव ठाकरे
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ, लोकमंगलची बँक खाती गोठवण्याचे आदेश
अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, चंद्रशेखर आझाद यांचा इशारा
म्हाडानं घटवला आमदारांचा कोटा; खेळाडू, अनाथांना होणार फायदा मोठा
नागपूरजवळच्या जंगलात वाघाच्या बछड्याचे सहा तुकडे आढळले
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
मुंबईला मिळणार नवीन राजधानी एक्स्प्रेस, जानेवारीअखेर धावणार