शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

आदेश झुगारून कोल्हापूरमध्ये टोलवसुली सुरू!

By admin | Updated: June 17, 2014 03:48 IST

आज होणार, उद्या होणार, अशी रोज हुलकावणी देत असलेला कोल्हापूर शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील टोल अखेर सोमवारी सायंकाळी ५च्या सुमारास सुरू झाला

कोल्हापूर : आज होणार, उद्या होणार, अशी रोज हुलकावणी देत असलेला कोल्हापूर शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील टोल अखेर सोमवारी सायंकाळी ५च्या सुमारास सुरू झाला. राज्य शासनाने रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमल्याने ते होईपर्यंत टोलवसुली करू नये, असे कोल्हापूरचे दोन्ही मंत्री अनुक्रमे हसन मुश्रीफ व सतेज पाटील आणि पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे सांगत असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केली. गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा टोल सुरू झाला आहे. सायंकाळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिरोली जकात नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले व टोलवसुली बंद पाडली. उर्वरित नाक्यांवर मात्र टोलवसुली सुरू राहिली. अपुरी कामे असल्याने टोलवसुली करता येणार नाही या मुद्द्यावर टोलविरोधी कृती समितीच्या याचिकेवर २७ फेब्रुवारीस उच्च न्यायालयाने टोलवसुलीस स्थगिती दिली. त्याविरोधात कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ४ मे रोजी स्थगिती उठवली व जुलैअखेरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. परंतु त्या वेळी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने कंपनीने वसुलीचे धाडस केले नव्हते. ती पार पडल्यावर कंपनीच्या हालचाली नेटाने सुरू झाल्या़ परंतु पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता. या हालचाली पाहून परवाच ९ जूनला सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मोर्चा काढला होता. परंतु तरीही कंपनीच्या हालचाली थांबलेल्या नव्हत्या. गेल्या बुधवारीच पोलीस बंदोबस्त दिल्यावर टोलवसुली सुरू करण्याची तयारी कंपनीने केली होती; परंतु त्या दिवशी तो सुरू झाला नाही. त्याच्या आदल्याच दिवशी राज्य शासनाच्या सूचनेवरून रस्ते विकास महामंडळाने रस्ते प्रकल्पाच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली. ही समिती अजून पाहणी करण्यासाठी कोल्हापूरला आलेली नाही. दरम्यान, टोल सुरू झाल्याने लोकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. (प्रतिनिधी)