शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बांधकामांचा आज फैसला

By admin | Updated: May 5, 2015 01:30 IST

घनकचरा व्यवस्थापनाबाबत उचित कार्यवाही न करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये,

कल्याण : घनकचरा व्यवस्थापनाबाबत उचित कार्यवाही न करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यावर महापालिकेतर्फे आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती देताना बांधकामांवरील स्थगिती उठविण्यासंदर्भात विनंतीअर्ज न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मंगळवारी सुनावणीदरम्यान न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दोन वर्षांपूर्वी उचित कार्यवाहीचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने १३ एप्रिल रोजीच्या सुनावणीत केडीएमसीला न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. महापालिका क्षेत्रात कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाने जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने अखेर कार्यवाहीला प्रारंभ केला असून कचरा डम्पिंगसंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. आधारवाडी येथील डम्पिंग बंद करण्याबरोबरच उंबर्डे येथे कचरा टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १८ महिन्यांचा लागणारा कालावधी पाहता तोपर्यंत कचरा मांडा आणि बारावे येथील आरक्षित जागांवर तूर्तास टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष बाब म्हणजे उंबर्डे येथील प्रकल्पाबाबत निविदाही काढण्यात आली आहे. ही सर्व माहिती न्यायालयात दिली असून नवीन बांधकामांवर टाकलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती महापालिका प्रशासनातर्फे केली आहे. (प्रतिनिधी)