शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ३८९ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: April 4, 2017 03:34 IST

महापालिका स्थापनेनंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला

पनवेल : महापालिका स्थापनेनंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. या ग्रामपंचायतींमधील एकूण ३८९ कामगारांचा पगार गेल्या सहा महिन्यांपासून दिलाच नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सर्वच पक्षांना निवेदने देण्यात आली आहेत, मात्र तोडगा निघत नसल्याने कामगारांनी कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. म्युन्सिपल मजदूर युनियन व इंडियन सिटीझन फोरमच्या माध्यमातून १२ एप्रिल रोजी पालिकेवर धडक देऊन न्याय मागणार आहेत. याकरिता पालिकेच्या दहा विभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात येणार आहे. यासंदर्भात कळंबोलीतील कालभैरव सभागृहात अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर, रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. नोकरभरतीत अनियमिततेचा ठपका ठेवत सर्वच कामगारांचा पगार पालिकेने रोखून ठेवला आहे. याकरिता तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र काहीच निष्पन्न होत नसल्याने कामगारांनी सर्व कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरभरतीत अनियमितता झाली असेल तर दोषींवर कारवाई करा, मात्र पात्र कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नका, असा प्रश्न कामगार नेते रमाकांत पाटील यांनी उपस्थित केला. या कामगारांमध्ये सफाई कामगार, कारकून, लिपिक, प्लॅनर, वाहन चालक आदींसह विविध प्रकाराच्या कामगारांचा यामध्ये समावेश आहे. कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात खारघर गावातही बैठक घेण्यात आली आहे. बैठकीला शेकडोंच्या संख्येने पालिकेचे कामगार उपस्थित होते. कामगारांनी खारघर विभागीय कार्यालयात पालिकेचे विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. विधान परिषदेत लक्षवेधी पनवेल महापालिका १ आॅक्टोबर २०१६ रोजी अस्तित्वात आली असून तेव्हापासून ३८९ कामगारांना आजतागायत वेतन देण्यात आलेले नाही. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी विधान परिषदेत शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी मांडली. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याकरिता २७ फेब्रुवारीला समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अंतिम निर्णयानंतर यासंदर्भात निर्णय घेता येईल. काही ग्रामपंचायतींनी पालिका स्थापन होण्याच्या आदल्या दिवशी नियमबाह्य भरती केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये काही नियमित कामगार देखील भरडले जात आहेत. चार दिवसांपूर्वी यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. - राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, पनवेल महानगर पालिका