शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा बळी राजकीय दबावातून

By admin | Updated: August 21, 2014 01:06 IST

पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे.

व्याघ्रवधावरून हलकल्लोळ : वन्यजीवप्रेमींचा आरोपचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे. यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.मंगळवारी सायंकाळी पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी गावाजवळील जंगलात वनविभागाने शॉर्प शूटरच्या साहाय्याने वाघाला ठार केले होते. वाघ आणि मानवाच्या संघर्षाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून केवळ राजकीय दबावापोटी वाघ मारले जात आहेत, असा आरोप होत आहे. ठार केलेला वाघ नर होता. प्रत्यक्षात नरभक्षी वाघ नर नसून मादी होती, असाही आरोप स्थानिक जनतेच्या कथनावरून वन्यजीवपे्रमी करीत आहेत.केवळ अडीच वर्षे वयाचा हा वाघ पूर्ण वाढ झालेला नसून बछडा होता. या वयात वाघाचे बछडे अधिवास निश्चित करणे आणि शिकार करण्याचे प्रशिक्षण मातेकडून घेत असतात. हे लक्षात घेतले तर, तो नरभक्षक नव्हता हेच स्पष्ट होते, असा युक्तिवाद वन्यप्रेमींनी केला आहे. परिसरातील सात व्यक्तींचा वाघाकडून बळी जाणे ही घटना दु:खदायकच आहे. जनप्रतिनिधींनी मतदार संघात विकासकामे न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. मात्र जनप्रतिनिधी यावर उपाय सुचविण्यापेक्षा थेट वाघाला मारण्यासाठी आग्रही भूमिका घेतात, हे राजकीय लाभासाठी असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी गेल्या सोमवारी, ‘वाघाला वन विभागाने मारावे, अन्यथा आम्हीच त्याला ठार करू’ असे आव्हान देत आठवडाभराचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १७ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघाला मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १९ तारखेच्या सायंकाळी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. शोभाताई फडणवीस यांच्या या विधानावर वन्यजीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. जनतेच्या भावना भडकविणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करून राजकीय स्वार्थापोटी वाघांचा बळी घेणाऱ्या नेत्यांचाच बंदोबदस्त करावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील वन्यप्रेमींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)