शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट आरक्षण अ‍ॅप पडद्याआड

By admin | Updated: March 23, 2015 02:14 IST

प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीटसेवेत अनेक पर्याय उपलब्ध केले जाणार होते.

मुंबई : प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीटसेवेत अनेक पर्याय उपलब्ध केले जाणार होते. यासाठी पाच मोबाइल अ‍ॅप्सद्वारे एसटीचे तिकीट आरक्षण सेवा देण्याचा निर्णय झाला. यातील एका अ‍ॅपमध्ये ही सेवा सुरू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला. मात्र या अ‍ॅपच्या प्रसिद्धीबाबत एसटी महामंडळाच्या उदासीन भूमिकेमुळे हे अ‍ॅप अजूनही पडद्याआड राहिले आहे. वर्षानुवर्षे तिकीट खिडक्यांवर तिकीट आरक्षण सेवा दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून कालांतराने महामंडळाच्या इंटरनेट प्रणालीद्वारेही आरक्षणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर एसटी महामंडळाकडून इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण केल्यानंतर त्याचा येणारा एसएमएसही प्रवासात ग्राह्य धरण्याची मुभा देण्यात आली. तिकीट सेवांमध्ये हा बदल केला जात असतानाच महामंडळाने प्रवाशांकडून नेहमीच वापरल्या जाणाऱ्या पाच मोबाइल अ‍ॅपमधून आरक्षण सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेड बस, ट्रॅव्हल यारी, बस इंडिया, मनी टू मोबाइल, हम्प्स अशा मोबाइल अ‍ॅप्समधून प्रवाशांना एसटीचे तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध केली जाणार होती. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ट्रॅव्हल यारी अ‍ॅपवर एसटी आरक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. ही सेवा उपलब्ध झाल्यास एसटीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची चाललेली धडपड कमी होईल आणि सहज तिकीट उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ही आशा फोल ठरल्याचे दिसते. एसटी महामंडळाने एका अ‍ॅपमध्ये ही सेवा सुरू केल्याचा दावा केला आहे. मात्र हे अ‍ॅप ट्रॅव्हल यारी आहे की अन्य कोणते हे सांगू शकले नाहीत. मुळात अशाप्रकारची सुविधा सुरू होत असल्याबाबत एसटी महामंडळाकडून कोणतीही प्रसिद्धी करण्यात आली नाही. त्यामुळे अशी सेवा मिळणार असल्याची माहितीच एसटी प्रवाशांना नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रवासी प्रतीक्षेतया अ‍ॅपवर तिकीट आरक्षण करताना १२ तासांच्या आत आरक्षण करणे गरजेचे असणार आहे, असे सांगतानाच या सेवेची माहिती प्रवाशांना दिली जाईल, असे महामंडळाकडून वारंवार सांगण्यात आले होते. मात्र प्रवाशांना अद्याप या अ‍ॅपची माहिती मिळालेली नाही.