उत्तरेत थंडीचा कहर, राज्यात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 21:05 IST2019-12-19T21:05:15+5:302019-12-19T21:05:43+5:30

राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे़. 

Thunderstorm in the north, the chance of rain in the state | उत्तरेत थंडीचा कहर, राज्यात पावसाची शक्यता

उत्तरेत थंडीचा कहर, राज्यात पावसाची शक्यता

ठळक मुद्देकोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

पुणे : उत्तर भारतात थंडीचा कहर होत असतानाच राज्यात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. २२ व २३ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे़. 
दिल्ली येथे गेल्या १६ वर्षातील सर्वात कमी किमान तापमान ५़२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले़ पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागात थंडीचा कहर सुरु आहे़. तसेच सर्वत्र दाट धुके पडत असून दुष्यमानता ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे़. 
राज्यात कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़. राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळपास पोहचले आहे़. 
२० व २१ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. २२ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. २३ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. 
़़़़़़़़़
 पुण्यात डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी किमान तापमान १३़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार आहे़. २२ ते २५ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते १६ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे़ २२ डिसेंबरला शहरात अत्यल्प स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 

Web Title: Thunderstorm in the north, the chance of rain in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.