'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 20:32 IST2021-02-26T20:31:49+5:302021-02-26T20:32:05+5:30

covid 19 in washim: रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

three times daily health check up of 229 students infected by covid 19 in washim | 'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा

'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या शाळेतील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेला भेट देवून आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील २२९ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाºयांचे पथक शाळेमध्ये तैनात करण्यात आले. त्याचबरोबर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोग्य विभागाने तातडीने या सूचनांची अंमलबजावणी करून या शाळेमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या शाळेचे तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पुन्हा शाळेला भेट दिली. तसेच सद्य:स्थिती जाणून घेतली.

व्हिडीओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद
बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्हा प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जात आहे.

Web Title: three times daily health check up of 229 students infected by covid 19 in washim