शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन तीन आठवडे

By admin | Updated: December 4, 2014 02:43 IST

: विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची दिनदर्शिका तयार करण्यात आली असून त्यानुसार अधिवेशनाचा कार्यकाळ

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची दिनदर्शिका तयार करण्यात आली असून त्यानुसार अधिवेशनाचा कार्यकाळ हा २६ डिसेंबरपर्यंत म्हणजे तीन आठड्यांचा असून प्रत्यक्षात कामकाज मात्र दोन आठवडेच अर्थात १४ दिवस होणार आहे.विदर्भात होणारे अधिवेशन एक महिना चालवावे, अशी आग्रही मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाल्यावर ते किती दिवस अधिवेशन चालवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सरकार नवीन असल्याने आणि तीन आठवडे पुरेल इतके कामकाजही नसल्याने अधिवेशन दोनच आठवड्यात गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दोन आठवड्यांच्या कामकाजाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र विधिमंडळ सचिवालयाच्या दिनदर्शिकेत ८ ते २६ डिसेंबरपर्यंतचे कामकाज देण्यात आले आहे. या १९ दिवसात फक्त १४ दिवस कामकाजाचे आहेत. इतर पाच दिवस सुट्यांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे अधिवेशन जरी तीन आठवडे चालणार असले तरी प्रत्यक्षात कामकाज मात्र दोनच आठवड्याचे होणार आहे.दोन्ही सभागृहांच्या १४ दिवसांच्या कामकाजात शासकीय कामकाजावर अधिक भर देण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर हे महत्त्वाचे आहे. ही चर्चा ९ ला होणार असून ती दोन दिवस चालणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी शासकीय विधेयक मांडण्यात येईल. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवर चर्चा आहे. सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आणि पुरवणी विनियोजन विधेयक आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा होईल. तिसऱ्या आठवड्यात २००८-०९ च्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्यांवर चर्चा आहे. गुरुवारी २५ डिसेंबरला नाताळाची सुटी आहे आणि त्यानंतर शुक्रवारी शासकीय शासकीय कामकाज आहे.