शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 6:09 AM

प्राथमिक तपासातील माहिती; भाजपने केली चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

फेसबूकवर पोस्ट टाकल्याचा जाब विचारत पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदार करमुसे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण तसेच या घटनेशी संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. बुधवारी दिवसभर यातील संबंधित अनेकांची त्यांनी चौकशी केली. यामध्ये मुंबई पोलीस दलातील सुरक्षा विभागातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा, तसेच काही कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याची प्राथमिक असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. तसे असेल याची चौकशी होणार आहे. अर्थात, वर्तकनगर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृरित्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात असमर्थता दर्शविली आहे.

दरम्यान, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या प्रकरणात खुद्द मंत्र्यांचाच सहभाग असल्याचा आरोप असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.मी कायदा हातात घेतला नाही जितेंद्र आव्हाड यांचा दावाठाणे : मी केव्हाही कायदा हातात घेतलेला नाही. मात्र एखाद्याने वारंवार अशाप्रकारे वादग्रस्त पोस्ट टाकणे, कितपत योग्य आह,े असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली. राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी लोकमतशी चर्चा केली. एखाद्या मंत्र्याने अशा पध्दतीने कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला असता, आव्हाड म्हणाले की, मी कधीच कायदा हातात घेत नाही. तीन-चार दिवसांपासून सदर मनुष्य अश्लील शिविगाळ करत आहे. माझ्या मुलीवर, बायकोवर बलात्कार करणार, अशा धमक्या देतो. माझ्याच नावाचे फेक अकाऊंट तयार करतो. माझा दाभोळकर होणार म्हणून ट्विट केले जाते. एक माणूस अमरावतीवरुन येतो. तो सांगतो, आम्ही थेट गोळ्या घालतो डोक्यामध्ये, त्यामुळे कोण कायदा हातात घेतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात मी अशा पोस्टकडे कधीच लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे, हेच मी कार्यकर्त्यांनाही सांगत असतो.दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्यांचे विचार थांबलेले नाहीत. त्यामुळे अशा विकृत पोस्ट टाकल्या जातात. त्या थांबू शकणार नाहीत. एखाद्या मंत्र्याचे नागडे पोस्टर काढणे, तुझ्या मुलीवर बलात्कार करतो, असे लिहीणे; मौलाना, मुल्ला असे हिनवणे, असे अपप्रचार सुरुच आहेत, ते थांबणारे नाहीतच. उलट माझ्या ते अंगवळणी पडले आहेत, असे ते म्हणाले. तुमच्या राजीनाम्याची तुमची मागणी होत आहे, नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देणार का, असे विचारले असता, अशी मागणी कुणी केली आहे, मला याबाबत कल्पना नाही, असे आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस