शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाच्या आत्महत्येप्रकरणी तीन मैत्रिणींना अटक

By admin | Updated: May 27, 2014 05:47 IST

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिचा छळ करीत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन मैत्रिणींना अटक करण्यात आली आहे

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिचा छळ करीत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन मैत्रिणींना अटक करण्यात आली आहे. या वेळी प्रियंकाच्या वडिलांनी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पश्चिम बंगाल राज्यातील केतिका, कुयरीपाडा येथील प्रियंका नयन मुखर्जी हिने २५ सप्टेंबर २०१३ रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली नं. जी-१२मध्ये तिच्यासोबत प्रियंका जयप्रकाश काबरा (रा. जालना), प्रिया दीपक पवार (रा. वर्धा), स्नेहल रमेश महाजन (रा. कळंबोली, नवी मुंबई) या राहत होत्या. दरम्यान, प्रियंकाला तिच्या खोलीतील वर्गमैत्रिणी ‘तुम बंगाली लोगो को हिंदी के सिवा कुछ नही आता. हम मराठी है, हमसे मराठी मे बात किया करो’ असे म्हणून हिणवत असल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. तसेच तिला मानसिक त्रास देण्यात आल्याचे म्हटले आहे़ दोन महिन्यांपूर्वी प्रियंकाला मूतखड्याचा त्रास होत असल्याने तिला दवाखान्यात दाखल केले होते. या वेळी प्रियंकाने हा प्रकार वडिलांना सांगितला. मात्र डॉ. मुखर्जी यांनी मैत्रिणींमध्ये छोटेमोठे वाद होत असतात, सर्व सुरळीत होईल असे प्रियंकाला समजावत गावाकडे गेले होते. हा छळ असह्य झाल्याने तिने २५ मे रोजी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास वसतिगृहातील आपल्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. प्रियंका हिच्या मृत्यूला या तीन मैत्रिणीच जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)