लोकमत न्यूज नेटवर्कगणपतीपुळे : समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने भिवंडीतील तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून, एकाचा बुडून मृत्यू झाला. अमोल गोविंद ठाकरे (वय २५, भिवंडी) असे मृत तरुणाचे नाव असून, पर्यटक निवासासमोरील समुद्रकिनारी रविवारी पहाटे त्याचा मृतदेह सापडला.
भिवंडी येथून सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी शनिवारी आले होते. त्यापैकी अमोल ठाकरे, विकास विजयपाल शर्मा (वय २४), मंदार दीपक पाटील (वय २४) हे तिघे समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. तिघांनीही समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. हा प्रकार त्यांच्यासोबत किनाऱ्यावर असलेल्या अन्य मित्रांनी पाहिला आणि त्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी धावा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून मोरया वॉटर स्पोर्टच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तत्काळ धाव घेत मदत केली. यातील दोघांना पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, अमाेल हा खोल समुद्रात बेपत्ता झाला होता.
पाेलिसांच्या गस्तीत वाढ
गणपतीपुळे येथे शनिवार, रविवारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, यातील अतिउत्साही पर्यटक खोल समुद्रात पोहण्याची जोखीम घेत आहेत. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली.
Web Summary : One Bhivandi youth drowned at Ganpatipule after underestimating the sea's depth. Two others were rescued. The deceased's body was found near the shore. Increased police patrols are planned due to tourist drownings.
Web Summary : गणपतिपुले में समुद्र की गहराई का अनुमान न लगने से भिवंडी का एक युवक डूबा; दो अन्य को बचाया गया। मृतक का शव किनारे पर मिला। पर्यटकों के डूबने की घटनाओं के बाद पुलिस गश्त बढ़ाई जाएगी।