शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार गाववाडे पाणी पुरवठय़ापासून वंचित

By admin | Updated: June 1, 2015 02:10 IST

राज्यातील दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजनांची उद्दिष्टपूर्ती नाही.

बुलडाणा : पाणीटंचाईने राज्यातील १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८0२ वाड्यांवरील ग्रामीण जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. गत दोन वर्षात पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्यामुळे राज्यातील तब्बल ३ हजार ६४८ गाववाड्यांमध्ये नागरिक पाणी पुरवठय़ापासून वंचित राहीले आहे. विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होवू न शकल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील बर्‍याच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन २0१३-१४ आणि २0१४-१५ या वर्षामध्ये एकूण ९ हजार २६६ गाव आणि वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे बर्‍याच योजनांच्या जलवाहिन्याही गंजल्या असून, पाण्याच्या टाक्या कोरड्या पडलेल्या आहेत. काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील आपसी वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित नसल्याने जनतेच्या तोंडाला कोरड पडलेली आहे. जनतेला पिण्यायोग्य व पुरेसे पाणी पुरवावे या उद्देशातून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून राज्यामध्ये २00९ पासून हा कार्यक्रम सुरु आहे. २0१३-१४ मध्ये या कार्यक्रमातून ५0६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामं पूर्ण करण्यात आली. तर २0१४-१५ मध्ये ४ हजार २00 गाववाड्यांच्या उद्दिष्टपैकी १ हजार ५५३ एवढय़ाच गाववाड्यांची काम पूर्ण करण्यात आली; मात्र ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदच आहेत. *पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबविला जातो. या उपयायोजना म्हणून गावे आणि वाड्यामध्ये नवीन विंधण विहिरी, तात्पुरती नळपाणीपुरवठा दुरुस्ती, पुरक नळजोडणी, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, खाजगी विहिरीचे अधिग्रहण, विहीरी खोल करणे, गाळ काढणे आणि बुडक्या विहिरीचे बांधकाम करण्यात येते; मात्र गत दोन वर्षात या योजनांच्या कामांची काम उद्दिष्टाप्रमाणे पूर्ण न झाल्याचे राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अहवालात नमूद आहे.