...अब बरबाद भी हम करेंगे! भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 11:00 IST2022-02-14T10:58:49+5:302022-02-14T11:00:33+5:30

भाजप वि. शिवसेना संघर्ष टोकाला; उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद

three and half bjp leaders will go to jail says shiv sena mp sanjay raut | ...अब बरबाद भी हम करेंगे! भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार; राऊतांचा हल्लाबोल

...अब बरबाद भी हम करेंगे! भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार; राऊतांचा हल्लाबोल

मुंबई: हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला रोखठोक इशारा दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेला संपूर्ण पक्ष उपस्थित असेल. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असतील. उद्या आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं चिखलफेक सुरू आहे. आरोप केले जात आहेत. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला इशारा दिला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील. त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असं भाजपचे नेते सांगत असतात. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा, असा गर्भीत इशाराच राऊत यांनी दिला.

आम्हाला वारंवार धमत्या दिल्या जाताहेत. आव्हानं दिली जात आहेत. राजकारणात एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली आहे. हमाम सब नंगे होते है. आम्हाला धमक्या देऊ नका. तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही. मी तर अजिबात घाबरत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, असं राऊत म्हणाले.

Web Title: three and half bjp leaders will go to jail says shiv sena mp sanjay raut