...अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 14:22 IST2018-10-28T14:15:08+5:302018-10-28T14:22:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

...अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, अशी धमकी देणाऱ्या आशयाचे पत्र आहे. नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’वर हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी पाठविले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे ‘भुजबळ फार्म’वर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.