शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

त्या २३ डॉक्टर्सवर कारवाई हवीच

By admin | Updated: June 29, 2016 02:58 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चालू असलेल्या डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने एल्गार पुकारला आहे.


ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चालू असलेल्या डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने एल्गार पुकारला आहे. स्वत:च्या मालकीच्या तसेच खाजगी रु ग्णालयात काम करून महापालिकेकडून लाखो रुपये पगार घेणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेने ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच येथील डॉक्टरांच्या गैरकारभाराला पाठीशी घालणाऱ्या डीनचाही रुग्णालयाचा कारभार काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मागील आठवड्यात कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रु ग्णालयातील बेजबाबदार डॉक्टरांचा भोंगळ कारभार अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी उघडकीस आणल्यानंतर २३ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, हे डॉक्टर त्या वेळी रुग्णालयातच होते, अशी पाठराखण रुग्णालय प्रशासनाने करून ते अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कॅन्टीन अथवा इतर विभागांत फिरत होते, असा कयास थेट डीन सी. मैत्रा यांनी लावला आहे.
त्यांच्या हजेरीवरदेखील रुग्णालय प्रशासन आणि पालिका यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळेच ते जर हजर नसतील तर त्यांचा पगार कसा काय काढला जातो, असा सवालही सावर्डेकर यांनी उपस्थित केला आहे.
>डीनही घालतात पाठिशी
मुळात हे डॉकटर आपल्या कर्तव्यावर आहेत की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी रु ग्णालयाच्या डीन मैत्रा यांच्यावर आहे.
मात्र, त्या दोषी डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या कामचुकार डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.