शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:20 PM

भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे.

- रवींद्र देशमुखमुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीतही शिवसेना-भाजप युती आघाडीवर दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. आघाडीत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहे. मात्र काँग्रेसची सुस्ती गेली नसल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती झाली असली तरी काँग्रेस नेत्यांच्या नजरा अशोक चव्हाण यांच्याकडेच लागल्याचे चित्र काँग्रेसमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा मंजूर करायचा का, असा पेचही काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. परंतु, अखेरीस चव्हाण यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली.

थोरात यांनी धडाक्यात सुरुवात केली असली तरी पक्ष संघटनाच्या बाबतीत ते नगर जिल्ह्यातच अडकून पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनीही थोरात केवळ संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. चव्हाण यांची नांदेडवर असलेली पकड काही प्रमाणात कमजोर झाली असली तरी, विधानसभेला नांदेडकर त्यांच्या पाठिशी राहिल अशी खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाचा प्रचार करण्यात अशोक चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अशा स्थितीत राज्य काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडेच असावे असं काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे.