Uddhav Thackeray : “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:07 IST2022-10-11T16:07:12+5:302022-10-11T16:07:43+5:30
निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे.

Uddhav Thackeray : “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आलं होते. दोन्ही गटाकडून त्यादृष्टीनं प्रत्येकी तीन पर्याय सुचविण्यात आले होते. आता निवडणूक आयोगानं आपला निकाल जाहीर केला आहे. यात ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नव्या चिन्हाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत "ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..." शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, असं कॅप्शनही देण्यात आलंय.
"ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..."
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 11, 2022
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे pic.twitter.com/4T4kABXBUs
ठाकरेआणिशिंदेगटालानावहीमिळालं
ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यास निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला निवडणूक आयोगानं 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव वापरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. दोन्ही पक्षाकडून पक्षाच्या नावासाठी प्रत्येकी तीन पर्याय देण्यात आले होते.