शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं; राष्ट्रवादी आमदाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:14 IST

जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं नाराज आमदाराने सांगितले.

पुणे - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव करून भाजपानं बाजी मारली आहे. या निवडणुकीत मविआच्या अपक्ष आणि घटक पक्षांशी काही मते फुटली आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत असलेल्या नाराज आमदारांची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. 

यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनीही त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. दिलीप मोहिते म्हणाले की, गेल्या दोन अडीच वर्षापासून आमचा कुणी विचार केला नाही. मंत्रालयात आल्यावर अजितदादांना भेटायचो. सगळ्या समस्या त्यांना सांगायच्या. सगळ्या पक्षातील आमदारांना मदत करण्याचं काम ते करतात. अजित पवार नसते तर हे सरकार टिकलं नसतं. आमच्यासारख्या आमदारांचा ते विचार करतात. तर बाकीच्यांनी का करू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

इतकेच नाही तर जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. गेली वर्षभर आमच्या अनेक फाईल्स मंत्रालयात पडून आहेत. त्या माझ्या वैयक्तिक नाही. पंचायत समिती इमारत, प्रशासन इमारत, पोलीस स्टेशनची इमारत तालुक्याकरता आहे. मी त्याला निधी द्या म्हणतोय त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. असं राजकारण करू नये. आमचं राजकारण अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला परंतु तरीही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल माझी नाराजी आहे असं स्पष्टपणे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले. 

अपक्ष आमदारांची मते मिळाली नाहीत - शिवसेना राज्यसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, भाजपाने जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले. तसेच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRajya Sabhaराज्यसभा