BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:40 IST2019-10-03T18:27:26+5:302019-10-03T18:40:18+5:30
Maharashtra Election 2019 BJP Candidate's 3rd List : भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच
भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या यादीनंतर भाजपाने 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यानंतर, आता 4 उमेदवारांची तिसरी यादी भाजपाने जाहीर केली आहे.
भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच 52 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. मात्र, ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसेंचा नाव दुसऱ्या यादीतही नसल्याचं उघड झालं. त्यानंतर, भाजपाने 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्येही भाजपा नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंना तिकीट देण्यात आलं नाही.
भाजपाने विधानसभा निवडणुकांसाठी तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत भाजपाने 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
मालाड पश्चिममधून रमेश ठाकूर
रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी
साकोली येथून परिणय फुकेंना
शिरपूर येथून काशीराम पावरा
या 4 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. पण, तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचं नाव नाही. त्यामुळे खडसे आणि तावडे अद्यापही वेटिंगवरच असल्याचं दिसून येतंय.