शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सासरी मतदान करण्यासाठी महिलांना 'हे' १४ पुरावे महत्वाचे; तरच करता येईल मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:15 IST

Bhandara : २०२४ च्या मतदार यादीचे २००२ सी मॅपिंग सुरू आहे. जागृत सुनांनी मतदान हक्क कायम ठेवण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्टा सुरू केली आहे. मतदान करण्याचा तुमचा हक्क आहे, पण जर तुमच्याकडे २००२ चे पुरावे नसतील तर हा हक्क कायमचा हिरावला जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर: २००२ नंतरच्या लग्न झालेल्या सुनांना सासरी मतदान करण्यासाठी निवडणूक विभागाच्या आदेशाने काही पुरावे गरजेचे असल्याचे कळवले आहे. यात सुनेच्या आई-वडिलांचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे स्वतःचे पूर्ण नाव गाव, तालुका, जिल्हा, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक व २००२ च्या यादीतील अनुक्रमांक ठरविण्यात आला आहे.

२०२४ च्या मतदार यादीचे २००२ सी मॅपिंग सुरू आहे. जागृत सुनांनी मतदान हक्क कायम ठेवण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्टा सुरू केली आहे. मतदान करण्याचा तुमचा हक्क आहे, पण जर तुमच्याकडे २००२ चे पुरावे नसतील तर हा हक्क कायमचा हिरावला जाण्याची शक्यता आहे.

कारण निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमानुसार आता २०२४ च्या मतदार यादीतील नावांचे २००२ च्या यादीशी मॅपिंग केले जात आहे.

यात ज्यांचे नाव २००२च्या यादीत सापडणार नाही किंवा जे आवश्यक पुरावे देऊ शकणार नाही, त्यांचे नाव मतदार यादीतून कमी केले जाणार आहे. या नव्या प्रक्रियेमुळे विशेषता लग्न होऊन आलेल्या सुनांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे सुनेला आपले नाव मतदार यादीत टिकविण्यासाठी माहेरच्या आई-वडील किंवा आजी आजोबांच्या २००२ च्या नोंदी सक्तीने शोधाव्या लागणार आहेत. त्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढणार आहे. 

मतदार यादीत नाव नसल्यास हे १४ पुरावे गोळा करून ठेवा

२००२ पूर्वीची मतदार यादी किंवा जुने निवडणूक पावती, जमीन / मालमत्तेची कागदपत्रे किंवा भाडेकरू असल्याच्या नोंदी, नागरिकत्व प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट, एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे, शासनाने दिलेला कोणताही अधिकृत परवाना / प्रमाणपत्र, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र/दस्तऐवज, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते /पासबुक, जन्म प्रमाणपत्र, बोर्ड किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र, न्यायालयाच्या नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे. रेशन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र 

क्यूआरकोड उपलब्ध

२००२ ची मतदार यादी शोधण्याकरिता प्रशासनाने क्यूआरकोड उपलब्ध करून दिला आहे. तसेच ECINET या मोबाइल अॅप याद्वारे २००२ ते २०२४ मधील मतदारांची नावे, आपल्या परिसरातील बीएलओचे नाव व मोबाइल क्रमांक शोधता येणार आहे हे विशेष!

"एसआयआर अंतर्गत सर्व मतदारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जवळच्या बीएलओकडे आवश्यक कागदपत्र घेऊन मतदार नोंदणी निश्चित करा."- शीतल घावटे, तहसीलदार, लाखनी

English
हिंदी सारांश
Web Title : Crucial documents for married women to vote in husband's home.

Web Summary : Women married after 2002 need specific documents to vote at their husband's. Voter list mapping with 2002 data risks name removal if proof lacks. Fourteen documents, including old voter lists, property papers, and birth certificates, are accepted. QR codes aid list searches.
टॅग्स :VotingमतदानWomenमहिलाnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र