... Therefore, the policy in the house is the same in politics: Prakash Ambedkar's suggestive statement about the State government | ...म्हणून जी घरात नीती तीच राजकारणात पण : ठाकरे सरकारविषयी आंबेडकरांचे सूचक वक्तव्य 

...म्हणून जी घरात नीती तीच राजकारणात पण : ठाकरे सरकारविषयी आंबेडकरांचे सूचक वक्तव्य 

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आघाडीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत वेळोवेळी आपल्या भूमिका जाहिर देखील केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्याच्या 'CMO' या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून औरंगाबादचा संभाजीनगर व उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आल्यामुळे नामांतराचा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच मुद्द्याचा संदर्भ घेत वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारविषयी सूचक वक्तव्य केले आहे. 

पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या हालचाली सुरु आहे. शिवसेनेची औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याबाबत पहिल्यापासून एक ठाम भूमिका आहे. मात्र काँग्रेसने या नामांतराला स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे. घरात सारखे वाद झाले की नेमके काय होते हे आपल्या सगळ्यांनाच चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे जी घरातील नीती तीच राजकारणात देखील अस्तित्वात आहे. यात नवीन काहीच नाही. 

... म्हणून पुण्याला संभाजी महाराजांचं नाव देणे योग्य...  
पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. या बोलताना ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पुण्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला जर कोणाचे नाव द्यायचा विचार झाला तर त्यांचे नाव अगदी योग्य राहील, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

''धिस ईज अ राईट टाईम!'' धनंजय मुंडे प्रकरणावर महत्वपूर्ण भाष्य 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो. त्याच अनुषंगाने आता मुंडे यांनीच 'धिस ईज अ राईट टाईम' म्हणावे असे महत्वपूर्ण विधान केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... Therefore, the policy in the house is the same in politics: Prakash Ambedkar's suggestive statement about the State government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.