शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अजून आठवडाभर असणार परतीच्या पावसाचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 12:09 IST

१४ ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़..

ठळक मुद्दे१६ व १७ ला मराठवाड्यासह राज्यात पाऊसयेत्या १६ व १७ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून माघारी परतला आहे़ महाराष्ट्रात मात्र अजून आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम असणार आहे़. येत्या १६ व १७ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकणात पनवेल ६०, माथेरान ४०, कर्जत ३०, अंबरनाथ, उल्हासनगर २०, माणगाव, वेंगुर्ला १० मिमी पावसाची नोंद झाली़. मध्य महाराष्ट्रात श्रीगोंदा २०, जामखेड, जत, जुन्नर, खटाव, वडूज, महाबळेश्वर १० मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात अंबेजोगाई ३०, लातूर २०, हदगाव, मुदखेड, पारंडा, रेणापूर १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात एटापल्ली येथे १० मिमी पाऊस पडला़. मॉन्सूनचा कर्नाटकातील किनारपट्टी भागातील जोर कमी झाला असून सध्या तो केरळमध्ये सक्रिय आहे़. रविवारी दिवसभरात महाबळेश्वर ११, सातारा २०, सोलापूर ०़७, पुणे ०़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.१४ व १५ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. १६ व १७ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. .................

१४ ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़ .१६ व १७ ऑक्टोबर रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़. १७ ऑक्टोबर रोजी जालना, परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़ .

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरी