‘२७ जूनला कोल्हापुरात मोठा धमाका होणार, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाचे नेते भाजपात प्रवेश करणार’ धनंजय महाडिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 16:02 IST2023-06-17T16:00:06+5:302023-06-17T16:02:03+5:30
Dhananjay Mahadik: येत्या २७ जून रोजी कोल्हापूरमध्ये मोठा धमाका होणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करणात आहेत, असा धावा धनंजय महाडिक यांनी केला आहे.

‘२७ जूनला कोल्हापुरात मोठा धमाका होणार, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाचे नेते भाजपात प्रवेश करणार’ धनंजय महाडिकांचा दावा
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमधील दाव्या प्रतिदाव्यांना वेग आला आहे. दरम्यान, येत्या २७ जून रोजी कोल्हापूरमध्ये मोठा धमाका होणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करणात आहेत, असा धावा धनंजय महाडिक यांनी केला आहे. महाडिकांच्या या दाव्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाडिक यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, येत्या २७ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा दौरी अद्याप निश्चित व्हायचा आहे. हा दौरा जर निश्चित झाला तर त्यावेळी कोल्हापूरमधील इतर पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी हे भाजपात प्रवेश करतील. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट यामधील अनेक नेते भाजपात येण्यास उत्सुक आहेत. त्यांचा पक्षप्रवेश आम्ही २७ जूनला घेणार आहोत.
भाजपा राज्यातील एक नंबरचा पक्ष ठरला असला तरी कोल्हापूरमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नव्हती. दरम्यान, धनंजय महाडिक यांना गतवर्षी राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या सनसनाटी विजयानंतर कोल्हापूरमधील भाजपाची कोल्हापूरमधील ताकद काहीशी वाढली आहे.