महामंडळांवरील नियुक्त्यांना कालमर्यादा नाही - दानवे

By Admin | Updated: September 2, 2015 01:27 IST2015-09-02T01:27:40+5:302015-09-02T01:27:40+5:30

राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांना काही कालमर्यादा नाही, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज याबाबतची अनिश्चितता कायम ठेवली

There is no time bound for appointments on corporations - demons | महामंडळांवरील नियुक्त्यांना कालमर्यादा नाही - दानवे

महामंडळांवरील नियुक्त्यांना कालमर्यादा नाही - दानवे

मुंबई : राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांना काही कालमर्यादा नाही, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज याबाबतची अनिश्चितता कायम ठेवली. ते भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
या नियुक्त्या कधी करणार यावर ते म्हणाले, की भाजपा आणि शिवसेनेत महामंडळांचे वाटप अंतिम झाले आहे. त्यात कोणताही वाद नाही. इतर मित्रपक्षांना कोणती महामंडळे द्यायची, हा भाजपा आणि त्या पक्षांमधील प्रश्न आहे. त्यावर निर्णय केला जाईल. भाजपाची यादी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. महामंडळांसाठी सर्व इच्छुकांना म्हाडा, सिडकोच हवे असते, असा चिमटाही त्यांनी काढला. भाजपा मंत्र्यांच्या कामगिरीचे आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून मूल्यांकन करीत आहात का, या प्रश्नात ते म्हणाले की सगळेच मंत्री चांगले काम करीत आहेत. कोणीही नाराज नाही! (विशेष प्रतिनिधी)

Web Title: There is no time bound for appointments on corporations - demons