शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील २२८ लाचखोरांचे निलंबन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 02:04 IST

मुंबईसह ठाणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड येथील परिस्थिती

मुंबई : लाचखोरीच्या जाळ्यात अडकूनही राज्यभरात २२८ जणांचे निलंबन अद्याप झालेले नाही. यात ग्रामविकास आणि शिक्षण व क्रीडा विभागातील सर्वाधिक लाचखोरांचा समावेश आहे. एकीकडे दोषसिद्धीचे प्रमाण कमी असताना, प्रशासनाकड़ून अशा प्रकारे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याने लाचखोरीला आणखी बळ मिळत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून लाचखोरांविरुद्ध कारवाई केली. यापैकी मुंबई (२५), ठाणे (१४), पुणे (१६), नागपूर (५१) , नाशिक (४), अमरावती (२४), औरंगाबाद (३९), नांदेड (५५) येथील परिक्षेत्रात कारवाई केलेल्या लाचखोरांचे अद्याप निलंबन करण्यात आलेले नाही. एसीबीने जारी कलेल्या आकडेवारीनुसार, यात इतर ६२ लोकसेवकांसह प्रथम श्रेणी वर्गातील २८, द्वितीय २९, चतुर्थ ७, तर सर्वाधिक तृतीय श्रेणीतील १०२ जणांचा समावेश आहे.ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद/ पंचायत समितीमधील ४८, शिक्षण व क्रीडा विभागातील ४६ त्यापाठोपाठ महसूल/नोंदणी, भूमिअभिलेखमधील ३० जणांचा समावेश आहे. यातच पोलीस, कारागृह आणि होमगार्ड विभागातील १५ जण लाचखोरीच्या गुन्ह्यांत अटक होऊनही अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.यात २०१३पासून ते आतापर्यंत केलेल्या सापळा कारवाईतील हे आरोपी आहेत. यातील बरीचशी प्रकरणे ही २०१८ची आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरीमध्ये पकडली गेलेली ही मंडळी अजूनही प्रशासनाच्या पटलावर आहेत.लाचखोरीची ३६२ कारवाईएसीबीने जानेवारी ते ९ आॅगस्टपर्यंत ३६२ सापळा कारवाई केली आहे. यात ५०४ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ५३८ सापळा कारवाईत ७१८ जणांवर कारवाई करण्यात आली होती.