बीकेसीतील आरबीआयच्या इमारतीमध्ये आग, जीवितहानी नाही

By Admin | Updated: September 4, 2015 10:18 IST2015-09-04T10:18:30+5:302015-09-04T10:18:42+5:30

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे.

There is no fire in the building of BKC, life-threatening | बीकेसीतील आरबीआयच्या इमारतीमध्ये आग, जीवितहानी नाही

बीकेसीतील आरबीआयच्या इमारतीमध्ये आग, जीवितहानी नाही

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. 

बीकेसी येथील आरबीआयच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळ दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे समजते. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

 

Web Title: There is no fire in the building of BKC, life-threatening