'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 21:29 IST2025-05-23T21:28:15+5:302025-05-23T21:29:23+5:30

Raj Thackeray News: मागील काही वर्षात ठाकरे आणि पवार या घराण्याभोवती राजकारण केंद्रीत झाले आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य केले जात आहे. याबद्दलच राज ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.  

'There is definitely an attempt to end the Thackeray-Pawar brand', Raj Thackeray's big statement | 'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray: ठाकरे आणि पवार ब्रॅण्ड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच सुरू आहेत, पण ते संपणार नाहीत, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राजकारण सोडा, पण महाराष्ट्र आज खूप वाईट अवस्थेमध्ये आहे, एवढं निश्चित आहे, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तकला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सद्यस्थिती ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. 

ठाकरे पवार ब्रॅण्ड संपणार नाही -राज ठाकरे

या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, 'संपवण्याचा प्रयत्न चाललाय यात काही वाद नाही. निश्चितच! पण, तो संपणार नाही. मी हे लिहून द्यायला तयार आहे. तो संपणार नाही."

वाचा >>पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

"प्रश्न असा आहे की, या सगळ्यांमध्ये आमचे आजोबा. महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या बरोबरीने तुम्ही संगीतात किंवा इतर क्षेत्रात बघितलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे. त्यानंतर माझा. मी येतो, उद्धव येतो", असे राज ठाकरे म्हणाले. 

"प्रश्न असा आहे की, या सगळ्यात व्यक्ती येतातच, पण आडनाव असतंच. मला असं वाटतं की, आडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे", असे राज ठाकरे म्हणाले. 

मला खरं काय ते दिसतं -राज ठाकरे

सगळे जेव्हा उजवीकडे (भाजप) जात असतात, तुम्ही डावीकडे का जाता? असा प्रश्नही राज ठाकरेंना विचारण्यात आला. 

राज ठाकरे म्हणाले, 'मला खरं काय ते दिसतं. ताज उदाहरण म्हणजे मी आता युद्धाबद्दल बोललो होतो. सहा अतिरेक्यांना मारण्यासाठी किंवा अतिरेकी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नाही. आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणून शकत नाही."

"देशाच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या. त्याला तुम्ही आता काय म्हणणार? आपण आपलं काय करून घेतलं? मी माझ्या त्यावेळी म्हटलं होतं की, हीच संधी आहे. आपल्या हाताला काय लागलं?", असे प्रश्न राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाबद्दल केले.

Web Title: 'There is definitely an attempt to end the Thackeray-Pawar brand', Raj Thackeray's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.